खो-खो संघात नांदगाव विद्यालयातील मुलींची निवड

| पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची 2022-23 ची 25 वी कुमार मुली गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा झाली. ही स्पर्धा रोहा तालुका खो-खो असोसिएशन तालुका रोहा यांच्या यजमान पदाखाली नुकतीच घेण्यात आली. स्पर्धेत सुधागड तालुक्यातील नांदगाव विद्यालयातील कुमार मुली गटातील खो-खो संघाने सहभाग घेऊन अंतिम चार संघांत आपले स्थान निश्‍चित केले. या संघातून रुचिता मोहने, साक्षी खैरे व सानिका ठकोरे या कुमार गटातील मुलींची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड झाली आहे. निवड झालेल्या मुलींची आणि त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संभाजी ढोपे, नागेश सायगावकर व जयश्री अहिरराव यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version