| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायतमधील तमाम कर्मचार्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता दिनांक 1 मे 2022 पासून बेमुदत संप पुकारला होता. मात्र मंगळवारी हा संप स्थगित करण्यात आल्याची घोषणा राज्य नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी केली. सोमवारी मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत संपकरी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी प्रभारी प्रधान सचिव, अवर सचिव सहस्त्रबुद्धे आयुक्त तथा संचालक, पी.एस.खदगावकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविल्याने तसेच कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांची येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष भेट घेण्याचे नगरविकास मंत्र्यांनी जाहीर केले.राज्यातील एकूणच, राजकीय परिस्थितीचा विचार करता तसेच शासनाने संप स्थगित करण्याचे आवाहन केले.त्या आवाहनाला प्रतिसाद देत नपा, नगरपंचायत कर्मचारी संघटनांनी सुरु असलेला संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. संघटनेच्यावतीने कर्मचार्यांच्या मागण्या करता सतत पाठपुरावा करण्यात येईल. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली आहे.