पोयनाड येथे ना. ना. पाटील यांची जयंती साजरी

पेझारी | वार्ताहर |
शेतकरी, कामकरी, दीन-दलितांचे कैवारी, कुळ कायद्याचे जनक, क्रांतियोद्धा स्वर्गीय नारायण नागू पाटील तथा आप्पासाहेब यांची 129 वी जयंती कोएसो ना.ना. पाटील संकुलामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी कोएसोचे ज्येष्ठ संचालक माजी आ. पंडित पाटील, सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे, शाळा समिती सदस्य यशवंत गुरुजी, चरी ग्रामपंचायतीचे सरपंच स्वप्निल पाटील, पेझारी ग्रामपंचायत सदस्या योगिता दांडेकर, प्राचार्य डी.पी. कुलकर्णी, शशिकांत पाटील, किशोर पाटील, आप्पासाहेबांचे चाहते, तसेच संकुलातील सर्व सेवक वर्गाने स्मारकातील आप्पासाहेबांच्या प्रतिकृतीस अभिवादन केले.

Exit mobile version