तळोजात अमली पदार्थ नष्ट

| पनवेल | वार्ताहर |

तस्करीच्या माध्यमातून देशात आणण्यात आलेले तब्बल 31 किलो 948 ग्रॅम अमली पदार्थ केंद्रीय महसूल गुप्तचर (डीआरआय) यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तळोजा येथे नष्ट केले आहेत, या अमली पदार्थांची किंमत 265 कोटी रुपये इतकी आहे. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने हेरोइन, कोकेन, गांजा आदी अमली पदार्थांचा समावेश आहे. तालुक्यातील तळोजा येथील केंद्रामध्ये हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत झालेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी, 19 जुलै रोजी 865 कोटी रुपये मूल्याचे व 124 किलो वजनाचे अमली पदार्थ, तर 13 डिसेंबर रोजी 54 किलो वजनाचे व 410 कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.

Exit mobile version