नरेंद्र महाडिक समाज भूषण पुरस्कार

| महाड | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी महाडच्या नरेंद्र महाडिक यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. किशोर झोडगेवार, आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमन भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकेरिया आदी मान्यवर उपस्थित होते. महाडीक हे महाडच्या सामाजिक क्षेत्रात गेली तीन दशके सातत्याने कार्यरत असून विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांचा कृतीशिल प्रवास सुरू आहे. संत रोहिदास विकास मंडळ, हिरवळ प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषद, रंगसुगंध, ॠतुरंग, पर्ण फाउंडेशन इ.सारख्या संस्थांच्या विविध उपक्रमात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

Exit mobile version