| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन आयोजित आदर्श माता पुरस्कार वितरण महाड लाडवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य मनोज काळीजकर, सेंट ज्युवियर्स स्कूलचे चेअरमन जॉन्सन डिसूजा, माजी नगराध्यक्ष प्रा. सूर्यकांत शिलीमकर, वीरेश्वर महाराज देवस्थान कमिटीचे पंच अनंत शेठ , माजी मुख्याध्यापक अ.वि. जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्या बरोबरच शैक्षणिक, ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कार्यात योगदान देणार्या मान्यवरांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आदर्श माता मंदाताई परशुराम दरेकर, इजाबेल डिसूजा , चांढवे येथील सौ. रेवती कदम, महाड येथील सौ.अर्चना पाटील, यांना आदर्श माता पुरस्कार तर शिक्षक वसंत साळुंखे, पोलादपूर येथील अँड. मोहन राठोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याबरोबरच प्रतापगड येथील चंद्रकांत आप्पा उतेकर यांना मावळा पुरस्कार तर रानबाजीरे मठाचे मठाधीश बळीगिरीनाथ महामुनी महाराज बाबा यांना समाज भूषण पुरस्कार आणि प्रतापगड येथील हॉटेल व्यवसायिक अजित जाधव यांना दुर्गप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.