। पेण । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे पाटणोली ग्रामपंचायतचे सरपंच तथा युवा नेते नरेंद्र (भाई) पाटील यांचे वडील रामभाऊ पुरूषोत्म पाटील (वय 80) यांचे अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. पाटील हे महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते नरेंद्र पाटील यांनी राजकारणात वडीलांची सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, सुना, नातवंड असा मोठा पाटील परिवार आहे. त्यांच्यावर पाटणोली येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी माजी.आ. धैर्यशील पाटील, दर्शना पाटील, संजय जांभळे, गुरूनाथ मांजरेकर, संजय कडू, शोमेर पेणकर, निवृत्ती पाटील, समिर म्हात्रे, मंगेश दळवी, निलकंठ म्हात्रे, राकेश वर्तक, विवेक जोशी यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.