अन्य खेळाडूंना चार सुवर्ण पदक
| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यस्तरीय बुडोकॉन कराटे स्पर्धेत कर्जत येथील कराटेपटू नरेश बडेकर यांनी अजिंक्यपद मिळविले आहे. ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत कर्जत शहरातून सहभागी झालेल्या अनेक कराटेपटू यांनी पदकांची लयलूट केली असून त्या खेळाडूंना चार सुवर्ण पदक मिळाले आहे.
ठाणे येथील युनायटेड बुडोकॉन कराटे अॅकॅडमी यांनी नववी युबीकेअकप खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यभरातुन 400 कराटेपटू यांनी सहभाग घेतला होता. ठाणे येथील शेयनाई हॉल सभागृहात आयोजीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कर्जत येथे आघाडीचे कराटेपटू नरेश बडेकर यांनी अजिंक्यपद पटकावले. त्याचवेळी या स्पर्धेत सहभागी झालेले कर्जत शहराती कराटेपटू तन्वी बडेकर हिने दोन रोप्य पदक तर हर्ष बडेकरला एक सुवर्ण आणि एक रोप्य पदक मिळाले. तर विराज शिंदे यास एक कांस्य पदक, अनुज चौहान यास एक कांस्य पदक आणि सोहम कांबळेयाने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले. सुजात मोरे यास एक रोप्य आणि कांस्य पदक मिळाले तर पायल भोसले हिने दोन सुवर्ण तर भुषण बडेकर याने एक सुवर्ण पदक,आणि नरेश बडेकर यांनी एक सुवर्ण तसेच अजिंक्यपद पटकावले. हे सर्व स्पर्धक कर्जत मधील रेम्बो बुडोकॉन कराटे अॅकॅडमीचे कराटेपटू असून र्त्यांना वसंत शेट्टी, नरेश नथु बडेक, विशाल गायकवाड, भुषण बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते.