| शिर्डी | प्रतिनिधी |
सध्याचे राज्यकर्ते संकुचित विचारांचे असल्याचे दिसून येत आहे. सत्ता मिळविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमारपणे वापर करुन अनेक राज्यांवर हल्ला केला जात असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डी येथे केला आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवारांचे लिखित भाषण ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखविले. या लिखित भाषणातून पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदीय लोकशाहीत केंद्र आणि राज्यात वेगळे सत्ता असू शकते. केंद्रातील सत्तेत राज्याचे मान राखला पाहिजे. अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे. केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये बंगाल इथे भाजची सत्ता नाही. पण, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्रात, भाजपची सत्ता नव्हती पण केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमदार फोडून सत्ता मिळवली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सामान्य माणसाला ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयए आदी संस्था माहिती नव्हत्या. या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधानांनी समाजातील सर्वच घटकांशी सामंजस्य राखून प्रगतीच्या मार्गावर नेणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे विकासाचा व्यापक दृष्टीकोन हवा. दुर्देवाने तसे दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दुसर्यात जात आहेत. राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. प्रकल्प राज्या बाहेर गेले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली.
तसेच संकुचित विचाराचे राज्यकर्ते आल्यावर राज्य अधोगतीला जाऊ शकतो, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली. राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहे. या प्रश्नाकडे राज्यकर्ते लक्ष देत नाही. असे ते म्हणाले.
देशात राज्यात संकुचित विचारांचे सरकार; पवारांचा भाजपवर हल्लाबोल
