| मुंबई | प्रतिनिधी |
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवसापासून धडाकेबाज खेळ करणाऱ्या नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने दिमाखदार विजयासह उपांत्य फेरी गाठली.तसेच मुंबई शहरच्या एसएसजी फाउंडेशन आणि मुंबई उपनगरच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमीच्या संघांनीही जोरदार खेळ करत अंतिम चार संघात आपले स्थान पक्के केले. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ब्रम्हा विरुद्ध पार्ले महोत्सव आणि वाघजाई विरुद्ध एसएसजी अशा उपांत्य लढती खेळल्या जाणार आहेत. दोन्ही लढतीतील विजेते रात्री उशिरा जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सुसाट असलेल्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबचा अक्षरशः धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. या अत्यंत निरसवान आणि एकतर्फी सामन्यात प्रफुल झवरे, आकाश शिंदे, स्वयम मालोदे, रत्नेश पाटील यांच्या चढाई-पकडींच्या वेगवान खेळाने 29-11 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. त्यानंतर हार मानलेल्या विजय क्लबने सामना वेळेआधी संपवण्यातच धन्यता मानली आणि 20 मिनिटांचा खेळ 10 मिनिटांतच संपवत ब्रम्हा संघाने 38-11 फरकाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
सेमीफायनलचे चार संघ निश्चित, पाहा वेळापत्रक.पंकज मोहितेचा दर्जेदार खेळअंकूर स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाउंडेशन यांच्यात थरारक संघर्ष पाहायला मिळाला. उत्तरार्धात प्रो सुपरस्टार पंकज मोहितेने एकापोठापाठ एक अशा भन्नाट चढाया करत एसएसजी संघाला पहिल्या 10 मिनिटांतच 32-24 अशी आघाडी मिळवून देत सारा खेळच बदलला. एसएसजी संघाने 42-29 अशा फरकाने उपांत्य फेरी गाठली.
नाशिक, रत्नागिरी, मुंबई संघ उपांत्य फेरीत
