| अलिबाग | प्रतिनिधी |
खंडाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेले नासिकत कावजी यांनी शुक्रवारी (दि.17) रोजी पदभार स्विकारला. शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते पुष्पगूच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, दिनानाथ पाटील, ग्रामस्थ, हरिश्चंद्र पाटील, उदय वेळे, मजी सरपंच संतोष गुरव, विलास थळे, रविंद्र वाडेकर, जितेंद्र थळे, माजी उपसरपंच विजय थळे, मंदार कावजी, देविदास वर्तक, सुरेश म्हात्रे, किरण वेळे, मोहन कावजी, गणेश कावजी, गणेश वेळे, श्रीकांत पाटील, नामदेव पाटीलस सचिन थळे, सागर गुरव, प्रणय पाटील, संजिव पाटील, मनोहर पाटील, नथुराम पाटील, विलास वालेकर, अनंत वैद्य, श्रीकांत पाटील आदीसह सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नासिकेत कावजी यांनी यापूर्वीदेखील सरपंच म्हणून भूमिका बजावली आहे. खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील गावे,वाड्यांचा विकास साधून तळागाळातील घटकांपर्यंत योजनेचा लाभ देणार, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच कावजी यांंनी यावेळी व्यक्त केला.