| म्हसळा | वार्ताहर |
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅ.ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे दि. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी दि.24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने तहसील कर्मचारी भालेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ग्राहकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरोगामी आणि व्यापक असा कायदा आहे. असे सांगताना एखाद्या मालाची विक्री चढत्या भावाने होत असेल किंवा मालावर दर्शविलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री होत असेल तर जिल्हा पातळीवर ग्राहक तंटा निवारण यांच्याकडे तक्रार करणे आवश्यक आहे तसेच एखादे वस्तूची खरेदी करताना कर पावती घेणे आवश्यक आहे. आपण खरेदी करीत असलेल्या मालाची क्वालिटि काय आहे, फसव्या व भुलविणार्या जाहिराती, ऑनलाइन खरेदी मधील वस्तूंमध्ये होत असलेली फसवणूक याबाबत ग्राहकांनी दक्ष राहिले पाहिजे असे तहसील कर्मचारी भालेकर, ग्रंथपाल प्रा. माशाळे, प्रा.डॉ. बेंद्रे यांनी सांगून उपस्थित सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास तहसील कर्मचारी भालेकर यांसह महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे, प्रा. समेळ, ग्रंथपाल प्रा. माशाळे, प्रा.भोसले, प्रा. डॉ. बेंद्रे सलमा नझिरी अतीका नझिरी, प्रा. सिद्दीकी, प्रा.नझिरी, प्रा हालोर, प्रा. दफेदार, प्रा. तांबे, प्रा. मुकादम यांसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. माशाळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. बेंद्रे यांनी केले, तर आभार तहसीलचे पुरवठा अधिकारी भालेकर यांनी केले.







