राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान उत्साहात

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा पंचायत गणाचे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अभियानांतर्गत सबकी योजना सबका विकास मोहीम नागाव ग्रामपंचायत सभागृहामध्ये राबविण्यात आली. नागाव ग्रुप ग्रामपंचायत व पंचायत समिती अलिबाग यांच्या विद्यमाने सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचे गणस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये रेवदंडा पंचायत गणातील नागाव ग्रुप ग्रामपंचायत व रेवदंडा ग्रामपंचायतीचा सहभाग होता.

या गणस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रभारी अधिकारी पं.स. अलिबाग बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता नूतन माने व पर्यवेक्षक अलिबाग पं.स. समूह समन्वयक इच्छा सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होते. यामध्ये नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागवेकर, रेवदंडा ग्रा.पं. सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच मंदा बळी, नागाव ग्रा.पं. अधिकारी श्‍वेता कदम, रेवदंडा ग्रा.पं. अधिकारी समीर म्हात्रे, रेवदंडा ग्रा.पं. सदस्य सुराराम माळी तसेच नागाव व रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.

या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान गणस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमांत संकल्प आधारित सन 2025/26 विकास आराखडा करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version