कर्जत येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत दिशा केंद्रातर्फे आरोग्यविषयक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील आहीर मार्गदर्शन केले. शिबिरात आहिर यांनी गरोदर मातेच्या बाळ गर्भात असताना लसीकरण, गरोदर पोषण आहार, बाळंतपण, अंगणवाडी पोषण आहार, शाळेत शालेय पोषण आहार, मोफत शिक्षण, मोफत धान्य, पाणी पुरवठा, रस्ता, वीज, घरकुल, स्मशान भुमीपर्यंतच्या सुविधा सरकार देते. यात आपले पण योगदान असले पाहिजे असे सांगितले.यावेळी कम्युनिटी ऍक्शन फार हेल्थ जिल्हा समन्वयक उज्जैन शिरसाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुळे, डॉ. ममता पांडे हे उपस्थित होते. कार्यक्रमास कम्युनिटी ऍक्शन फार हेल्थ प्रोग्रामचे जिल्हा पर्यवेक्षिका रेखा भालेराव, विमल देशमुख, कविता सूर्यवंशी, अकेश बिरजे, संतोष यांच्या माध्यमातून आयोजित कम्युनिटी ऍक्शन फार कार्यक्रम आयोजन केले होते.

Exit mobile version