| रत्नागिरी | प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. या अदालतीमध्ये जिल्ह्यातील 3 हजार 475 न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि 9 हजार 26 वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यातील 3 हजार 459 प्रकरणांचा निवाडा होऊन वाद संपुष्टात आले आहेत. लोकअदालतीमध्ये एकूण 9 कोटी 24 हजार 626 एवढ्या रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने मिटवण्यात आलेले आहेत.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 ए. एम. अंबाळकर, सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण निखिल गोसावी व इतर सर्व न्यायिक अधिकारी आणि विधीज्ञ उपस्थित होते. न्यायालयाची पायरी न चढताच मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या निर्णयामुळे विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोकअदालत यशस्वीतेसाठी अध्यक्ष गोसावी, सचिव निखिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समिती व त्यांचे कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
