राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

खारघरची स्नेहल माळी भारतात तिसरी

| पनवेल | वार्ताहर |

विजापूर कर्नाटक येथे नुकत्याच झालेल्या 28 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत खारघरची कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने दोन कांस्यपदक पटकवित 18 वर्ष वयोगटात 60 किमी सायकलिंग स्पर्धेत भारतात तिसरी आली. तसेच 30 किमी Road team time trial स्पर्धेत पण भारतात तिसरी आली. या स्पर्धेतीत सहभागी हे सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलोचे 1200 खेळाडू सहभागी झाले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहलने दोन रौप्यपदक पटकावली. याअगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे पाचवे पदक असून कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कांस्यपदक आणि रांची रौप्य पदक पटकावली होती.

Exit mobile version