राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

। चिरनेर । वार्ताहर ।

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती व्हावी या उद्देशाने उरण वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने परिसरातील ठिकठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.27) चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सहा आसनी इको टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी संघटना आणि ओम साई राम चिरनेर, कोप्रोली, गव्हाण फाटा पनवेल मार्गावर धावणार्‍या रिक्षाचालकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत उरण वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गलांडे, उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार, अंमलदार अशोक भूदलवर, काटे आणि पथकाच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी वपोनि वैशाली गलांडे यांनी अपघात कसे टाळता येतील आणि वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल, याविषयी वाहन चालकांना मार्गदर्शन केले. तर उपनिरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने अभियानात अनेक वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली.

Exit mobile version