राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा

रायगडच्या कार्तिका व राधिकाची निवड

| उरण | वार्ताहर |

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 31 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 रोजी बेतुल मध्यप्रदेश, पोलिस ग्राऊंड मध्यप्रदेश या ठिकाणी होणा-या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी डॉ.पिल्लाई ग्लोबल ॲकॅडमी खांदा कॉलनी या शालेतील राधिका गिरीश नारायनन (इयत्ता 9 वी) व कार्तिका गिरीश नारायनन (इयत्ता 12 वी) या दोघींची महाराष्ट्र शालेय तायक्वांदो संघात निवड झाली आहे.

राधिका व कार्तिका या पनवेल मधील व्ही. के. हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक श्री. सुभाष पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या विजयाचे श्रेय जाते त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणारे तायक्वांदो मुख्य प्रशिक्षक श्री. सुभाष पाटील व सहाय्यक प्रशिक्षीका प्राजक्ता अंकोलेकर त्यांचे वडिल डॉ. गिरीश नारायनन यांना तसेच डॉ. पिल्लाई ग्लोबल ॲकॅडमी शालेचे प्राचार्य श्री. प्रकाश नायर सर यांनी या यशाबद्दल राधिका व कार्तिका चे विशेष अभिनंदन केले.

तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व शाळेतील इतर कर्मचारी यांच्या कडून राधिका व कार्तिका वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version