| शिहू | वार्ताहर |
येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप रा.से. यो. जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. तुळसीदास मोकल, डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालय, रोहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
याप्रसंगी वेलशेत-आंबेघर येथील माजी सरपंच संतोष कोळी हे उपस्थित होते. प्रा. मोकल सरांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शिबिरात लागलेल्या चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात जेणेकरून तुम्हाला आयुष्य चांगले जगता येईल. प्रमुख पाहुणे व माजी सरपंच संतोष कोळी यांनी, गेली तीन वर्षे रा.से.यो. विभाग प्लास्टिक मुक्त पिगोंडे गाव होण्यासाठी योगदान देत असल्याने कार्यक्रम अधिकारी व शिबारार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पथनाट्य सादरीकरणातील विद्यार्थ्यांना रकमेच्या स्वरुपात बक्षीस दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. बक्षिसांचे वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले. या शिबिरात पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, जयवंत गायकवाड, प्राचार्य डॉ. संदेश गुरव, महेश गोसावी, प्रा.डॉ. विलास जाधवर, प्रा. नीलम महाले, प्रा.डॉ. राणी ठाकरे, प्रा. हेमंत जाधव यांनी मार्गदर्शन केले. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल गदमले हिने केले, तर आभार प्रदर्शन भार्गव यशपाटील यांनी केले. हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ, नंदकुमार बावकर, सुमित घासे, सारिका घासे, आयुष ताडकर यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.