| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात सुरु असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. माळरान, डोंगररांगा आणि पर्यटन क्षेत्रांचे निसर्गसौंदर्य ही खराब होत आहे.
औषधी वनस्पती, जंगली प्राणी, पक्षी, कीटकांचा मूत्यू होतो. याशिवाय वणव्यांमुळे वित्तहानी आणि अनमोल जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, शासनाचे सर्व विभाग यासंदर्भात तसेच जनजागृती करण्यासाठी कमी पडत असल्याची बाब सध्या समोर येत आहे. उरण हा मुंबई व नवीमुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरण यामुळे या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला आहे. काही नागरिक स्वार्थापोटी माळरान, डोंगररांगाना आगी लावून पळ काढत आहेत. त्यामुळे माळरान, डोंगररांगांचे आणि पर्यटन क्षेत्रांचे निसर्गसौंदर्य ही अशा आगीच्या भक्ष्यस्थानी खराब होत आहे.औषधी वनस्पती,जंगली प्राणी, पक्षी, कीटकांचा मूत्यू होत आहे. याशिवाय वणव्यांमुळे वित्तहानी आणि अनमोल जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शासन कमी पडत असल्याची बाब समोर येत आहे.
वणव्याने निसर्गसंपदेची राख
