। महाड । प्रतिनिधी ।
दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्यामुळे महाडमधील सेंट झेवियर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने 6 आणि 7 एप्रिल असे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
महाड येथील सिस्केप संस्थेच्या माध्यमातून या शिबिराचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नेण्यात आले, दिवेकर वाडी आणि चोचिंदे गवळवाडी येथे विद्यार्थ्यातर्फे गावातील प्रत्येक घरांमध्ये चिमणीचे घरटे लावण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्थानिकांशी संवाद साधला व प्रश्नावली तयार करून चिमणी बद्दल ची माहिती गोळा केली. तसेच ग्रामीण जीवनशैलीचा फार जवळून अभ्यास केला . गोठ्यातील शेण आणि गवताचा पेंडा यांचे तयार केलेले खत शिवाय शेण पोळ्या विद्यार्थ्यांनी समक्ष बघून त्याचा अनुभव घेतला . बैलगाडी, त्याला जुंपलेले बैल त्यांची कशा पद्धतीने जोपासना केली जाते याची माहिती देण्यात आली, गावातील घरां समोर शेणाने सारवलेले अंगण त्यावर टाकलेले मांडव आदी अनेक बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. यावेळी कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक खत, शेती या विषयांवर गणेश खातू व समृद्धी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . शिबिराची सांगता करण्यात आली, शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सीमा हेलेकर यांनी सर्वांचे आभार मानले.







