। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने सहाणगोठी येथे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा पुरूष गटाच्या अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेमध्ये सेमिफायनमध्ये ज्ञानेश्वर कोलवे संघाने गणेश दिवलांग संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच दुसर्या सेमिफायनलमध्ये नवजीवन पेझारी संघाने बजरंग बेली या संघाचा पराभव केला. तर अंतिम फेरी नवजीवन पेझारी व ज्ञानेश्वर कोलवे यांच्यात खेळविण्यात आले. अंतिम फेरीचा सामना उत्कंठा वाढविणारा झाला. खेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असतांना ज्ञानेश्वर कोलवे या संघाकडे 7 गुणांनी पिछाडी होती, ती पिछाडी मोडित काढत राहुल कोळी याने खेळाचे प्रदर्शन उत्तम करत सामना बरोबरीत सोडविला. नंतर पुन्हा पाच-पाच चढ्यांची वाढ देत सामना खेळविण्यात आला. परंतु शेवटच्या चढाईत नवजीवन यांनी यशस्वी पकड करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. नवीजीवनचे निलेश पाटील, छकू पाटील तर कोलवे संघाकडून राहुल कोळी यंनी उत्तम खेळ केला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवजीवन पेझारी, द्वीतीय क्रमांक ज्ञानेश्वर कोलव, तृतीय क्रमांक बजरंग बेली तर गणेश दिवलांग या संघांनी पटकाविला.
माजी आ.पंडीत पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्य. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह व रायगडचे कार्यवाह अॅड.आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरणाला तालुका चिटणीस अनिल पाटील, राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक छत्रपती यांच्या हस्ते व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे.पाटील, उपाध्यक्ष हिराचंद पाटील, प्रमोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, संजय मोकल, जगदीश पाटील, नरेश म्हात्रे, प्रमोद ठाकूर, प्रसाद भोईर, गजानन मोरे, लक्ष्मण गावंड, आशिष म्हात्रे, मृणाली मोकल, उल्हास पाटील, जनार्दन पाटील, हिरामण भोईर व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.