कर्जतचा युवक ठरला पहिला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’

। नेरळ । प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या नवज्योत देशमुख या क्रीडापटूने आंतराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन होण्याचा मान मिळविला आहे. ट्रायथलॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेली नवज्योत ह कर्जत तालुक्याचे सुपुत्र आहेत.

कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेत पोटलपाली गावातील नवज्योत मारुती देशमुख यांनी लोहपुरुष हा जागतिक दर्जाचा किताब पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेची क्रीडाविश्‍वात ख्याती आहे. स्पर्धेत सलग 3.8 किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी 2000 इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणार्‍या वार्‍याविरुद्ध 180 किमी सायकलिंग करणे आणि लगोलग 42.2 किमी धावणे ही आव्हाने पूर्ण करायच्या असतात.

भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी हे आव्हान नवज्योत देशमुख यांनी 13 तास 30 मिनिटांत पूर्ण केले. या स्पर्धेसाठी त्यांना पुणे येथील आयर्नमॅन प्रशिक्षक, पॉवरपीक्स अकादमीचे चैत्यन्य वेल्हाळ यांचे मार्गदशन मिळाले. नवज्योत गेली दोन वर्षाची मेहनत,जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

Exit mobile version