नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंजाब काँग्रेसमधील धूसफूस अजूनही कायम आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात 13 मुद्दे मांडले आहेत. पवित्र ग्रंथाचा अवमान, अंमली पदार्थ आणि दारू माफियांसह 13 मुद्द्यांचा उल्लेख सिद्धू यांनी पत्रात केला आहे. पंजाबह सरकारने या मुद्द्यांवर काम करावं, अशी मागणी त्यांनी सोनिया गांधींकडे पत्रातून केली आहे. सिद्धू यांनी या 13 मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीनुसार सरकारवर लक्ष ठेवण्याचं आपलं काम आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.