नवनीत राणांची खासदारकी धोक्यात


मुंबई | प्रतिनिधी |
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलं आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणार्‍या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

Exit mobile version