| रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नामांकित असलेली खानाव येथील अनंत गोंधळी फाउंडेशन व नवतरूण स्पोर्ट्स क्लब यांचे विदयमाने नवतरूण स्पोर्ट्स क्लब मैदानात खेळविल्यात आलेल्या मर्यादीत षटकांच्या ओव्हरआर्म ग्रामीण व खुल्या गटाच्या टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा दि. 22, 23, 24 डिसेंबर रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेत नव्या क्वीन एन्जल बामणगांव प्रथम विजेतेपदाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत प्रथम नव्या क्वीन एन्जल बामणगांव, व्दितीय क्रमांक बापदेव भेरसे, तृतीय क्रमांक काटमदेवी वणवली, चर्तुथ क्रमांक नवजीवन दिघोडी हे संघ विजेते ठरले तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलदांत नवजीवन दिघोडी संघाचा सागर पाटील (पिंटया), उत्कृष्ट गोलदांज बापदेव भेरसे संघाचा अनिकेत म्हात्रे, मालिकावीर पनवेलचा सुमित धोंगडे यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 1 लाख 50 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 80 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास 40 हजार रूपये रोख व भव्य चषक, चर्तुथ क्रमांकास 40 हजार रूपये रोख व भव्य चषक तसेच उत्कृष्ट गोलदांज सायकल, उत्कृष्ट फलदांज सायकल व मालिकावीर टि.व्ही सेट बक्षिस देण्यात आली.
या स्पर्धेचा शुभारंभ अनंत गोंधळी यांचे हस्ते करण्यात आले, प्रसंगी अॅड श्रध्दा ठाकूर, महेंद्र घरत, अॅड. प्रविण ठाकूर, राजा ठाकूर, प्रशांत अग्निहोत्री, रमेश नाईक, अनिल संघवी, अनुप गुप्ता उपस्थित होते.