नवाब मलिक ईडीच्या जाळ्यात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहेत. ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलंय. इकबाल कासकरनं नाव घेतल्यानंतर मलिक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इकबाल कासकर, इकबास मिरची, आणि अस्लम फ्रूट यांना ईडीनं ताब्यात घेतलं होतं. इकबाल कासकरनं ईडी चौकशीत मलिक यांचं नाव घेतल्याचं बोललं जातंय. त्यानंतर ईडीनं कारवाई करत मलिकांची चौकशी सुरु केली आहे.

दुसरीकडे भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईमागे कोणत्याही प्रकारचं सूडाचं राजकारण नसल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे.

नेमकं काय आहे मलिकांचं प्रकरण?
मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर, मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केली आहे. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकली, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

मालिकांचे कार्यकर्ते ईडीच्या दारात!
कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवरुन नवाब मलिकांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईवरुन तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ही कारवाई चुकीची असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version