| आगरदांडा | प्रतिनिधी |
नवाबकालीन पोलीस ठाण्यातील 47 निवासी खोल्यांची पडझड झाली असून, त्या जीर्ण झाल्या होत्या. राज्य सरकारने याची दखल घेऊन नवीन इमारतीकरिता निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी नवीन पोलीस इमारत उभी राहणार आहे.
दरम्यान, या पोलीस चाळीतील प्रत्येक खोलीमधील असलेल्या लादीमधून माती बाहेर येणे, निखळलेले दरवाजे, पडक्या भिंती, छपरातून पाणीगळती, लोखंडी खिडक्यांना गंज पकडणे, भिंतीचे सुटलेले प्लास्टर, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आदी गैरसोयींमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. नवाबकालीन पोलीस चाळीचा नूर कधी पालटणार असा सूर पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत होता. अखेर याची दखल राज्य सरकारने घेतली असून, लवकरच या ठिकाणी नवीन इमारत उभारली जाणार आहे.







