ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारतीसह पतीविरुद्ध एनसीबीची मोठी कार्यवाही

। मुंबई । वृत्तसंस्था ।

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही केली.

21 नोव्हेंबर 2020 रोजी, NCB नं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन-हाऊस ऑफिस आणि घरावर छापा टाकला होता. या छाप्यात दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीनं ताब्यात घेतलं. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ भारतीचा पती हर्ष लिम्बाचियालादेखील अटक करण्यात आली. भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली.

सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी आज २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

Exit mobile version