राष्ट्रवादीच्या आंदोलनाने सर्व्हिस रोडचे काम सुरु

रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा,भरणे नाक्यावर वाहतुकीची कोंडी
खेड । प्रतिनिधी।
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे पावसाळ्यात सर्व्हिस रोड वरती पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः येथील रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली होती. अनेक छोटे-मोठे अपघात आणि नित्याची वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक हैराण झाले होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांना या संदर्भात निवेदन दिले.आणि संमधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.त्यांनतर ठेकेदाराने सर्व्हिस रोडचे क्राँक्रीटीकरणाचे काम सुरु केले.त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.त्यामुळे भरणे नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. हेच काम पावसाच्या पूर्वी झाले असते तर आजची ही परिस्थिती ओढावली नसती. खवटी ते परशुराम या संपूर्ण हद्दीत सर्व्हिस रोडची कामे झालेली नाही. तर काही ठिकाणी अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत.तर पाण्याने भरलेल्या खड्यात मोटारसायकल,चारचाकी गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे हा दोन्ही बाजूचा रस्ता तात्काळ सुस्थितीत केला नाही.

लवेल,लोटे या दरम्यान रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रात्री पासून प्रत्यक्षात खड्ड्यात हरवलेल्या सर्व्हिस रोडचे काँक्रीटच्या नवीन रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू झाले. सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असल्याने काल रात्रीपासूनच भरणे नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ही एकेरी मार्गावरून वळवण्यात आल्याने भरणे नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळल्या.भरणे नाक्यावर नेहमी वर्दळ असते. त्यातच महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडीची समस्या याठिकाणी गेल्या वर्षभरापासून सातत्याने त्रासदायक ठरत आहे.

गेल्या वर्षभरापासून भरणे नाका येथे फ्लायओव्हरचे काम सुरू असून काही कारणांमुळे आजही हा फ्लायओव्हर पूर्ण होऊ शकलेला नाही. फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरू करताना चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीने महामार्गावरील वाहतूक ही दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडची तात्पुरती निर्मिती करून वळवलेली होती. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यावर सध्या काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रोज अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत. पण ठेकेदार आणी निढावलेल्या प्रशासनाने तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी अशीच भूमिका ठेवली असल्याने आम्हाला जनतेसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
माजी आ.संजय कदम

Exit mobile version