अनेकांचे पत्ते कट

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भिडणार

| माणगाव | सलीम शेख |

माणगाव पंचायत समिती गणांचे आरक्षण माणगाव तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. भौगोलिकदृष्ट्या माणगाव तालुका मोठा असल्याने पंचायत समितीचे एकूण आठ गण असून, जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत. या सर्व मतदार संघाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हे पक्ष या निवडणुकीत एकमेकांना भिडणार आहेत असे चित्र दिसत आहे.

माणगाव पंचायत समिती मध्ये यापूर्वी महायुती असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती झाले होते. त्यानंतर महायुती न झाल्याने शिवसेनेचे सभापती झाले होते. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झाले होते. गेल्या पाच वर्षात काळ नदी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत असणारे ॲड. राजीव साबळे हे आपल्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. ॲड. राजीव साबळे हे शिवसेनेत असताना शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि माणगाव पंचायत सभापती निवडून आणण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. माणगाव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगाव हे जिल्हा परिषद मतदार संघ मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात समाविष्ट आहेत तर मोर्बा आणि तळाशेत-इंदापूर जिल्हा परिषद मतदार मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील या मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 1. निजामपूर जि.प.- सर्वसाधारण, निजामपूर पं.स.- अनुसूचित जमाती, पाटणूस पं स.- ना. म. प्र. खुला, 2. गोरेगाव जि.प.- अनुसूचित जाती, लोणेरे पं.स.- सर्वसाधारण, गोरेगाव पं.स.- सर्वसाधारण महिला, 3) मोर्बा जि.प.- सर्वसाधारण, मोर्बा पं.स.- सर्वसाधारण महिला, वडवली/मांजरवणे पं. स.- सर्वसाधारण, 4) तळाशेत जि.प.- सर्वसाधारण महिला, तळाशेत पं.स.- ना.म.प्र. महिला, साई पं.स.- सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version