| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महविकास आघाडी मध्ये अस्वस्थता पसरलेली असताना त्याचा कोणताही परिणाम न होता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होवून हरिनाम घेत टाळ मृदुंगाच्या तालात तल्लीन झाले आहेत.
महाराष्ट्रात सत्तेच्या सारीपाटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील आमदार अनिकेत तटकरे यांनी मात्र या गदारोळात स्वतःला दूर ठेवून वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. या वारीचा व्हिडिओ स्वतः अनिकेत तटकरे यांच्या फेसबुक वर पोस्ट केले आहे. अनिकेत तटकरे यांचे वडील खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादी च्या पहिल्या फळीतील नेते असून अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातील मानले जातात. तर राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचे ते बंधू आहेत.