पुढील सुनावणी २३ जानेवारीला
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी संपली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुढील सुनावणी मंगळवारी (दि.23) सकाळी 11 वाजता होणार आहे.
जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या गटाने वेळ वाढवून मागितला आहे. वकिलांनी त्याला विरोध केला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याचा निर्णय घेतला आणि 23 तारखेला मुख्य सुनावणी ठेवली आहे. आज माझी साक्ष झाली नाही.
आजच्या सुनावणीत काय घडलं? अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत, ते आम्ही सुनावणी दरम्यान सादर करु अशी माहिती शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना दिली. दोन्ही गटांच्या बाजून योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे अध्यक्षांनी म्हटले होते. त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
उर्वरित 4 जणांची उलट तपासणी 23, 24 जानेवारीला होणार आहे. 25 तारखेला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. 29 जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार. 30 तारखेला अंतिम युक्तिवाद होणार असून 31 जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची आहे. त्यापुढे 8 ते 10 दिवस अंतिम निकाल जाहीर करणार, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.