राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता याचिकांवर उद्या गुरुवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती. याप्रकरणी राहुल नार्वेकर उद्या निकालवाचन करणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‌‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे नवीन नाव दिले होते. आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला होणार आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या याचिकेवर अंतिम आदेश देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार उद्या 15 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकाल देणार आहेत.

Exit mobile version