। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी (दि.14) दाखल करण्यात आले आहे. त्यांंच्यावर शस्त्रक्रिया होणार असून शरद पवार देखील रुग्णालयात पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे हे अद्याप समजू शकले नाही.