। वाशिम । प्रतिनिधी ।
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेले असतानाच वाशिम जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने ताबा मिळविला आहे. तर भाजपला केवळ दोन जागांवर विजय मिळविता आला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व निकाल हाती
एकूण जागा 14
(विजयी उमेदवार/पक्ष)
1)आसेगाव सर्कल : चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस ) पुन्हा विजयी
2) कंझरा सर्कल – सुनिता कोठाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
3) दाभा सर्कल – राजेश राठोड ( राष्ट्रवादी काँग्रेस)
4) काटा सर्कल – संध्याताई विरेंद्र देशमुख (काँग्रेस)
5) पार्डी टकमोर – सरस्वती चौधरी (अपक्ष) पुन्हा विजयी
6) उकळीपेन – सुरेश मापारी (सेना)
7) कवठा सर्कल – वैभव सरनाईक (काँग्रेस)
8) गोभणी – पूजा भुतेकर, (जनविकास) पुन्हा विजयी
9) भर जहागीर – अमित खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस)
10) कुपटा – उमेश ठाकरे (भाजपा) पुन्हा विजयी
11) तळप बु. सर्कल – शोभा गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
12) फुलउमरी – सुरेखा चव्हाण, (भाजपा) पुन्हा विजयी
13) पांगरी नवघरे सर्कल – लक्ष्मी सुनील नवघरे ( वंचित आघाडी) पुन्हा विजयी
14) भामदेवी सर्कल : वैशाली प्रमोद लळे (वंचित आघाडी) पुन्हा विजयी