| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी, क्रिकेट या खेळातून असंख्य खेळाडू तयार झाले आहेत. हा खेळ राज्य, देशपातळीवर पोहचला आहे. शेकापच्या माध्यमातून नागाव, वेश्वी या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहेत. खेळाडूंना ऑलंपिकपर्यंत पोहचण्यासाठी ॲथेलेटिक्स खेळात प्रगती करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर क्रीडासंकुले होणे काळाची गरज आहे. गावागावातून खेळाडू तयार झाले पाहिजे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.
आंबेपूर-बांधण या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. या कोर्टचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि.31) रोजी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्यासारखे अनेक मंडळींनी विधीमंडळात आमदार म्हणून अलिबागची शान राखली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळात खारेपाटातील उंची कायम टीकून ठेवली आहे.आदीवासीवाड्यांपर्यंत काँक्रीट रस्ता झाला पाहिजे. आदीवासी समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे. घसवड येथे सुसज्ज असे मासळी बाजारपेठ उभी केली जाणार आहे. पाऊस संपल्यावर त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. या बाजारपेठेचा डीपीआर तयार झाला आहे. वडखळ ते अलिबाग हा दुपदरी रस्ता लवकरच होणार आहे. डीपी प्लॅन तयार झाला आहे.
पांडवादेवी ते पेझारी पर्यंत पूल बांधण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे शेकापच्या माध्यमातून मंजूर केली आहेत. विकास कामे करीत असताना कधी टक्केवारी मागितली नाही. जे बोगस कामे करीत आहेत त्यांना वठणीवर आणण्याचे काम केले जाणार आहे. राज्याच्या बजेटपेक्षा अधिक कामे केली जात आहेत. निवडणूका समोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. हे धोरण चुकीचे आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबत आवाज उठवून सरकारच्या ही बाबत निदर्शनास आणून देणार.
विधीमंडळात चांगले लोकप्रतिनिधी बसले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासून कामाला लागा. पुढे जयंत पाटील यांनी सांगितले. चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने बांधण याठिकाणी चांगले बॅडमिंटन कोर्ट बांधले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करून खेळाडूंना घडविण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. या प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भविष्यात ग्रामपंचायत स्तरावर ॲथेलेटिक्सच्या बाबतीत काम करणार आहे. खेळातून सर्व स्तरातील घटक एकत्र येतात. चर्चा होते. यातूनच विविध प्रकारची कामे केली जाताता. स्पोर्ट्स कॉम्लेक्समुळे गावाचा एकीपणा टीकून राहतो. त्यापध्दतीने गावागावात क्रीडा संकुल उभारून येथील तरुणांना हक्काचे व्यासपिठ होणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी काम करीत असताना केंद्रबिंद कधीच विसरू नये. तरुणांना इतिहास समजला पाहिजे त्यापध्दतीने कार्यकर्त्यांनी काम करावे.
आ. जयंत पाटील
अनेक मान्यवरांची उपस्थिती माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, संदीप घरत, आंबेपूरच्या सरपंच सुमन पाटील, युवा नेते सवाई पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, प्रमोद राऊत, प्रकाश जैन, बाळू पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, संजना कीर, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख प्रिती पाटील, माजी सभापती विद्या म्हात्रे, माजी उपसभापती प्रकाश पाटील, कुंदा गावंड, अनिल चोपडा, शरद वरसोलकर, राजेंद्र म्हात्रे, सुरेश खोत, नंदकुमार मयेकर, दिपक पाटील, संदीप पाटील, नितीन पालकर, सोहम वागळे, ॲड. मनोज धुमाळ, जगदीश पाटील, कौस्तूभ पाटील, अशोक खोत आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मंडळी, शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ- चित्रलेखा पाटील कला, क्रीडा क्षेत्रात काम करण्याची प्रचंड आवड आहे. शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनी शिक्षण, कला, क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. या क्षेत्रामध्ये काम करीत असताना, क्रीडा क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात बाळगली. त्यानुसार गेल्या चार वर्षापासून क्रीडा चळवळ सुरु ठेवली. नागावसह वेश्वी या ठिकाणी अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारले. खारेपाटातील खेळाडूंसाठी ओलंपिकच्या धर्तीवर बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार पंडितशेठ पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नाने बांधण याठिकाणी बॅडमिंटन कोर्ट उभे करण्यासाठी जागा मिळाली. सहा महिन्यात कोर्ट उभारण्यात आले आहे. बॅडमिंटन कोर्टच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक व्यासपिठ मिळणार आहे. यातूनच अनेक खेळाडू घडून जिल्हा, राज्य पातळीवर आपल्या खारेपाटाचे नाव वेगळ्या उंचीवर नेतील असा विश्वास आहे. अद्ययावत असे सर्व सोयी सुविधांयुक्त असे हे कोर्ट आहे. त्याचा फायदा या परिसरातील खेळाडूंना होईल. असा विश्वास शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी प्रस्तावना करताना व्यक्त केला.