एकजूटीने लढा देण्याची गरज: नंदु तळकर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

1947 पुर्वीचा भारत या 75 वर्षानंतर देशामध्ये पहावयास मिळत आहे, ते विदारक चित्र आहे. 1947 नंतर भारत जन्माला आला. स्वराज्याचे सुराज्य निर्माण व्हावे, अशी संकल्पना होती. परंतु, देश अराजकतेकडे चालला असल्याचे चित्र आहे. त्याला कुठेतरी बंधन आणणे गरजेचे आहे. त्यासाठी जागृत राहण्याची आवश्यकता आहे, हे आपले कर्तव्य आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पालक पोटाला चिमटा काढून पैसे भरतात. मुले रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. मात्र, या पेपर फुटी प्रकरणानंतर शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला महत्त्च राहिले नाही, अशी परिस्थिती देशात सुरू आहे. हे भांडवलदारांचे सरकार आहे. त्यांना एकजुटीने विरोध करण्यासाठी प्रत्येकाने लढा दिला पाहिजे. दिल्ली येथील जंतर मंतर येथील तरुणांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केले. केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितला जात आहे; मात्र, या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती भयानक आहे, त्यांना आंदोलनातून ताकदीनिशी सामोरे जावे लागणार आहे, असे साहित्यिक नंदू तळकर यांनी आवाहन केले.

Exit mobile version