जातीच्या दाखल्यावर संशयाची सुई

दोन नावांचे दोन पासपोर्ट

| उरण | प्रतिनिधी |

पनवेलमध्ये कातकरी जातीच्या प्रमाणपत्रावरून नवा वाद उफाळला आहे. हेमा कैलास पवार यांच्या जात प्रमाणपत्र अर्जाच्या छाननीत तहसीलदार कार्यालयाला अनेक विसंगती आढळल्या आहेत. शालेय कागदपत्रांवर जात ‌‘नेपाळी‌’ अशी नोंद, तर ‌‘हेमा विष्णू कातकरी‌’ आणि ‌‘हेमा विष्णू शर्मा‌’ अशा दोन वेगवेगळ्या नावांचे पासपोर्ट समोर आल्याचा उल्लेख तहसीलदारांच्या दि.20 एप्रिलच्या अहवालात करण्यात आला आहे.अर्जदाराच्या नागरिकत्वाची, पासपोर्टची आणि आईच्या जातीच्या आधारे प्रमाणपत्र मिळविण्याच्या दाव्याची सखोल पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. भारतीय दूतावास, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्याबाबतही अहवालात नमूद आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक खुलासा झाल्याशिवाय जात प्रमाणपत्र देणे उचित नसल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कातकरी समाजाच्या हक्कांशी संबंधित या प्रकरणात आता उपविभागीय अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version