| पाली /बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील वर्हाड जांभूळपाडा येथील निलम श्याम पवार हिने शनिवार (दि.27) पार पडलेल्या वाशी मुंबई येथील ‘मेसमेरिक मिस इंडिया पेगिएन्ट 2024’ या स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पवार हिने 18 ते 30 कुमारी वयोगटात उत्कृष्ट सादरीकरण करीत फस्ट रर्नर अपचा मानाचा किताब जिंकला असून सुधागड व रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
नीलमचे शिक्षण पाली येथील ग.बा. वडेर हायस्कुल, तसेच शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात झाले असून अंगभूत कलाकौशल्य, जिद्ध, चिकाटी, महत्वाकांक्षा, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निलमने सौदर्य स्पर्धेत नावलौकिक मिळवले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील युवती, महिलांना प्रगतीच्या दिशेने कूच करणारे पंख आणि बळ देण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरली असल्याचे मत यावेळी तिने मांडले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, नवोदित स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
नीलम पवारचे सौदर्य स्पर्धेत यश
