पटकावली भरघोस बक्षिसे
19 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन
पाली/बेणसे | वार्ताहर |
सोलापूर येथील सीमा अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत पालीतील राजश्री लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांनी रोख रकमेसह पारितोषिक अशी भरघोस बक्षिसे मिळविली आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पालीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्पर्धेत यानी राठोड व काव्या गुप्ता या चॅम्पियन ठरल्या आहेत. तर पुनीत विनय ओसवाल, आर्यन हेमंत सोनावणे, सिद्धी योगेश राठोड, यश महेश गवारी व समृद्धी कारखेले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि, श्राव्या शेठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर नीती खिंवसरा, नित्या म्हसळेकर, पुरब शहा, नेहल मेहता, निधी शेठ, आश्वी ओसवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, भाजपचे राजेश मपारा, बँक ऑफ इंडिया पाली शाखेचे व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद गुप्ता व राजश्री लर्निंग सेंटरच्या संचालिका राजश्री बोलके यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.