। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक, तर भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. आता ही पदके जिंकल्यानंतर अवघ्या 14 दिवसात नीरज पुन्हा मैदानात उतरणार आहेत. नीरजने यापूर्वीच स्पष्ट केले होते की तो यंदा 22 ऑगस्टला होणार्या लॉझान डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे. त्याने यापूर्वी यंदाच्या हंगामात केवळ दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याला बाकी स्पर्धांमध्ये दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. तरी सध्या तो डायमंड लीगच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.
निरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करेल अशी चर्चा होती, पण त्याने या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत ही चर्चा सध्या तरी थांबवली आहे. पण तो येत्या काही दिवसात त्याच्या दुखापतीवर उपचार घेऊ शकतो. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हंगामातील सर्वोत्तम 89.45 मीटर लांब भाला फेकला होता. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता अँडरसन पीटर्सही लॉझान डायमंड लीगमध्ये ऍक्शनमध्ये दिसणार आहे. तसेच, या स्पधेत त्याला कडवी टक्कर दिलेला याकुब वाल्डेच देखील असणार आहे.