NEET Exam: नीट परीक्षा सुरळीत पार

परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी (दि.21) शांततेत व सुरळीत वातावरणात पार पडली. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परीक्षेचे प्रश्नपत्रिका व गोपनीय साहित्य सीआयएसएफच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी सखोल तपासणी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. परीक्षा केंद्र परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. प्रशासन, पोलीस यंत्रणा व परीक्षा अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीपणे पार पडली.

Exit mobile version