पोलादपूरमधील स्कायवॉक उभारणीकडे दुर्लक्ष

ड्रेनेज कम फूटपाथचे काम अद्याप सुरू, विद्यार्थी पालकांची शांतता रॅली

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पोलादपूर येथे स्कायवॉक उभारण्याची गरज असूनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. चौपदरीकरणामध्ये होणारा रस्ता पोलादपूर शहरात अंडरपास बॉक्स सिस्टीम म्हणूने उघडया पध्दतीचा भुयारस्वरूप दूतर्फा होत असल्याने चोळई नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील अंडरपास महामार्गावर पूर्वेकडीत आणि पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडना जोडणारे तब्बल जादाचे पाच पूल उभारण्यात आले आहेत तर पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड मात्र अद्याप वाहतूकीस सुरू झालेला नसल्याने गोव्याकडे आणि मुंबईकडे होणारी वाहतूक फक्त पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरून केली जात आहे.

पोलादपूरच्या पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड आणि त्यावरील ड्रेनेज कम फूटपाथचे काम अद्याप सुरू झाले नसून त्या सर्व्हिसरोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 1080 मीटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असल्याचे तसेच पोलादपूरच्या पूर्वेकडील सर्व्हिस रोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 850 मीटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स आहे,हेदेखील राष्ट्रीय महामार्गाच्या अंतिम आराखडयामध्ये नमूद करण्यात आले नाही. पोलादपूर शहरातील ग्रामीण रूग्णालयासह पार्टेकोंडपर्यंत सर्व्हिसरोड व ड्रेनेज कम फुटपाथ असूनही अद्याप तो एस.टी.स्थानकासमोरच रेंगाळल्याने चौपदरीकरणाचे पोलादपूर शहरात अरूंदीकरण होत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामुळे पोलादपूर एस.टी.स्थानकाकडे येणार्‍या बसेसची मागील बाजू या पुलांच्या कठडयाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलादपूर शहरातील पाच व्हेईक्युलर ब्रिजेसवरील दोन्ही सर्व्हिस रोडला जोडणारा भराव व किरकोळ कामे झाल्यावर गाशा गुंडाळून घेण्याच्या तयारीत असलेल्या एलऍंडटी ठेकेदार कंपनीला 20 सप्टेंबरला विद्यार्थी पालक शांतता रॅली व साक्षात शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढपुतळयाला साकडे घालून झालेल्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून जाता जाता एक स्काय वॉक उभारावा लागेल, असे चिन्ह दिसत आहे. या शांतता रॅलीमध्ये रयत विद्यामंदिर पोलादपूर, जनसेवा प्रशाला, यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि शंकरराव महाडीक इंग्लीश मिडीयम स्कूल या चार शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Exit mobile version