आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी नेपाळचा संघ जाहीर

| काठमांडू | वृत्तसंस्था |

नेपाळनेही आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात माजी कर्णधार संदीप लामिछानेलाही स्थान मिळाले आहे. या स्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचा आरोप असून त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र सध्या संदीप जामिनावर बाहेर आहे. न्यायालयातही खटला सुरू आहे. दरम्यान, संदीपही आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशनेही आपले संघ जाहीर केले आहेत. भारतीय संघाचीही लवकरच घोषणा केली जाणार आहे. आशिया कपमध्ये फायनलसह एकूण 13 सामने होणार आहेत. याअंतर्गत यजमान पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने होतील, तर अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे होणार आहे. तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप 2023 साठी नेपाळ संघाचे कर्णधारपद रोहित पौडेलकडे देण्यात आले आहे. संदीप फक्त गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

स्पर्धेतील दोन गट पुढीलप्रमाणे
गट-अ : भारत, पाकिस्तान आणि नेपाळ.
गट-ब : श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान.

22 वर्षीय अनुभवी फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने नेपाळच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यावर संदीपलाही अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संदीपची जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत संदीप पुन्हा नेपाळ संघासोबत खेळत आहे. मात्र या आरोपांमुळे त्याचे कर्णधारपद गेले. नेपाळ संघ रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख, ललित राजबंशी, भीम शार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, किशोर महतो, संदीप झोरा अर्जुन सौद आणि श्याम ढकल.

Exit mobile version