मोदींच्या घोषणेवर नेपाळचा संताप

रस्त्याचे काम बंद करा ; नेपाळ सरकार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत-नेपाळ सीमेजवळ रस्ता बांधणीची घोषणा करताच नेपाळने संताप व्यक्त केला आहे. लिपुलेख भागात पंतप्रधान मोदी यांनी रस्त्याच्या विस्ताराची घोषणा केली होती. यावर नेपाळने आक्षेप नोंदवून म्हटले की ही बांधणी अवैध आहे. नेपाळने रविवारी (ता.१६) भारताला काली नदी क्षेत्रात रस्त्यांची एकतर्फी बांधणी आणि विस्तार थांबवण्यास सांगितले आहे. नेपाळचा हा विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिपुलेख क्षेत्रात रस्त्यांचा विस्ताराची घोषणेनंतर काही दिवसानंतर सुरु झाला आहे. त्यावर नेपाळ आपला दावा करित आहे.

३० डिसेंबर रोजी उत्तराखंडच्या हलद्वानीमध्ये भाजपच्या वतीने आयोजित एका निवडणूक प्रचार फोरीला संबोधित करताना मोदींनी घोषणा केली होती, की सरकार उत्तराखंडच्या लिपुलेखमधील रस्ता आणि आणखीन रुंद करणार आहे. नेपाळचे सूचना आणि प्रसारणमंत्री आणि मंत्रिमंडळाचे प्रवक्ता ज्ञानेंद्र बहादूर कार्की म्हणाले, की काली नदीच्या पूर्वेत लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी आदी क्षेत्र नेपाळचा अविभाज्य भाग असून भारताने रस्त्यांची कामे व विस्तार थांबवला पाहिजे.

Exit mobile version