। नेरळ । प्रतिनिधी ।
परभणी येथे झालेले भारतीय संविधान प्रकरण, सामनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरण, बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून नेरळ बंदचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी (दि.23) सकाळपासून दुपारपर्यंत जाहीर करण्यात आलेला बंद यशस्वी झाला असून व्यापार्यांनी नेरळ बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नेरळमध्ये राज्यातील विविध घटनांवर बंद पाळण्यात यावा, अशी मागणी येथील तरुणांनी रविवारी (दि.22) बाजारपेठेतील व्यापारी व रिक्षा संघटनांची भेट घेऊन केली होती.







