नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: true; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील नेरळ रेल्वे गेट क्रमांक 21 रेल्वेच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामासाठी सलग सहा दिवस रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून 3 मार्च 2026 रोजी रात्री 08 वाजेपर्यंत सलग सहा दिवस हे फाटक बंद राहणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. वारंवार रेल्वे गेटमध्ये होणारे तांत्रिक बिघाड आणि आता थेट सहा दिवस बंद असल्यामुळे नेरळकरांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि रखडलेल्या उड्डाणपुलाबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दहावी ची परीक्षा सुरू असताना हे फाटक बंद राहणार असल्याने वाहनांना काही किलोमीटर अंतरावरून वाहतूक करावी लागणार आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यायी रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वाहनचालकांना आता दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट असा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

Exit mobile version