कर्जत तालुक्यात नेरळची श्रुती झांजे प्रथम

तालुक्यातील 17 शाळांचे निकाल 100 टक्के

। नेरळ । प्रतिनिधी ।

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून नेहमी प्रमाणे अनेक शाळांनी आपली 100 टक्के विद्यार्थी पास होण्याची परंपरा कायम राखली आहे. नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेची श्रुती झांजे हि विद्यार्थिनी 96. टक्के गुण मिळवून कर्जत तालुक्यात पहिली आली आहे.कर्जत शहरातील शारदा विद्यालयाचा विद्यार्थी ओम आनंद जाधव हा तालुक्यात दुसरा तर नेरळच्या एल.ए.इ.एस शाळेची विद्यार्थिनी स्नेहा मसने तालुक्यात तिसरी आली आहे. दरम्यान कर्जत तालुक्यात 47 शाळांपैकी 17 शाळांचे निकाल 100 टक्के लागला.

नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेची विद्यार्थिनी श्रुती झांजे हि 96. 60 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. तर त्या शाळेत स्वानंदी संतोष मगर हि 94. 40 टक्के गुण मिळवून दुसरी तर प्रज्वल पांडुरंग पवार हि विद्यार्थिनी 93. टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे या शाळेचा निकाल 100 टाकेन लागला असून हि या शाळेची सलग 13 वर्षांपासूनची परंपरा आहे. कर्जत येथील शरद मंदिर शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून तेथे ओम जाधव हा विद्यार्थी 95. टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. तर केतकी श्रीखंडे 93. टक्के गुण मिळवून दुसरी आणि सृष्टी पाटील 93 टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे. नेरळ येथील एल ए इ एस शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून तेथे स्नेहा मसने हि विद्यार्थिनी 95 टक्के गन मिळवून पहिली आली आहे तर असितेश कांबळे 94. टक्के गुण मिळवून दुसरा आणि माहीन तांबोळी तसेच बिपीन भंडारी हे दोघे 94. टक्के गुण मिळवून तिसरे आले आहेत.

नेरळ विद्यामंदिर शाळेचा निकाल 98 टक्के लागला आहे तेथे राज जाधव हा 91. टक्के गुण मिळवून पहिला तर प्रथमेश म्हसे 88. टक्के गुण मिळवून दुसरा आणि जयदीप घाडगे 87. टक्के गुण मिळवून तिसरा आला आहे. डिकसळ येथील शारदा इंग्लिश मिडीयम शकुल चा निकाल 100 टाकेन लागला असून तेथे सोनिया घारे हि 92 टक्के गुण मिळवून प्रथम तर सोहं लोंगले 87. टक्के गुण मिळवून दुसरा आणि भार्गवी पालकर 85. टक्के गुण मिळवून तिसरे आली आहे. कशेळे येथील भाऊसाहेब राऊत शाळेत भूमी घरत 9140 टक्के गुण मिळवून पहिली तर भैरवी मते 90. टक्के गुण मिळवून दुसरी आले आहेत. गीता घारे इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल 100 टक्के लागला असून हर्षदा जाधव 91. टक्के गुण मिळवून पहिली ,तर सानिया देशमुख 90. टक्के गुण मिळवून दुसरी आणि भक्ती कदम 88. टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे.मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट आदिवासी आश्रमशाळा माणगांववाडी शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून तेथे विवेक वसंत होला 69. 40 % हा प्रथम तर तनुजा चंद्रकांत सांबरी तसेच रेणुका लक्ष्मण केवारी 67. 80 टक्के गुण मिळवून दुसरे आणि करण भगवान निरगुडे हा 65. 80 टक्के गुण मिळवून तिसरा आला आहे. कर्जत तालुक्यात 47 माध्यमिक शाळांमधॅल तब्बल 3183 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यातील 3023 विद्यार्थी हे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 17 माध्यमिक शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत.

Exit mobile version