नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएईएस या शाळेत तब्ब्ल तीन विद्यार्थी 96.20 टक्के गुण मिळवून पहिले आले आहेत.नेरळ गावातील एलएईएस या शाळेमध्ये तीन विद्यार्थी पहिले आले आहेत.त्यात याद्निका शिवगण, तन्वी देशमुख, धानेश म्हसे हे तिघे 96.20 टक्के गुण मिळवून पहिले आले. तर समर्थ चव्हाण हा 95.80 टक्के गुण मिळवून दुसरा आणि कृष्णा दुबे याला 95.20 टक्के गुण मिळवून तिसरा आला.
नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश हायस्कुल मध्ये तन्वी पवन भागेश्वर हा 92 टक्के गुण मिळवून पहिला तर मोक्ष रोशन जैन 89.80 टक्के गुण मिळवून दुसरे आणि सानिका लगड 88. 40 टक्के गुण मिळवून तिसरा आला.तर नेरळ गावातील नेरळ विद्या मंदिर शाळेमध्ये आदिती नागरगोजे 91.20 टक्के गुण मिळवून पहिली आली तर प्रिया घाडगे हा 83 टक्के गुण आणि मनाली घनघाव 82. 80 टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे.वंजारपाडा येथील माथेरान व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पूर्वा तुकाराम मोरगे 95.40 टक्के गुण मिळवून पहिली आली असून आकाश पोबारी 94.20 टक्के गुण मिळवून दुसरा आणि श्रेया संतोष भोईर 92.80 टक्के गुण मिळवून तिसरा आला.
गौरकामत येथील स्वामी विवेकानंद हायस्कुल मध्ये पायल दशरथ मुने हा 83 टक्के गुण मिळवून पहिली तर ऋतिका रवींद्र बोडके आणि तिसरा क्रमांक ओमकार प्रभाकर मुने याने मिळविला आहे. तर वाकस येथील डाटा सामंत विद्यालयात वेदिका मधुकर शेळके 90.80 टक्के गुण मिळवून पहिली तर प्रियांका मनोहर गावडे 88 टक्के गुण मिळवून दुसरी आणि तिसर्या क्रमांक दिव्या बंडू भागीत तसेच कांचन रवींद्र शेळके हे राहिले. कोंडीराम शेंडे पाटील भडवल येथील हायस्कुल मध्ये प्रज्ञा कालेकर हि 88 टक्के गुण मिळवून पहिली तर तनुजा जनार्दन म्हसकर 87. 60 टक्के गुण मिळवून दुसरी आणि मनस्वी विलास माळी तिसरी आली आहे.
धामोते येथील नेरळ विद्या भवन मध्ये काजल नरेंद्र विरले 84.20 टक्के गुण मिळवून पहिली तर दीप्ती नाना तरे 82. 80 टक्के गुण मिळवून दुसरी आणि प्रथमेश दिनेश कालेकर 81.80 टक्के गुण मिळवून तिसरा आला.श्रमजीवी विद्यालय पोशीर मध्ये तेजस्विनी अंकुश राणे हि 88.60 टक्के गुण मिळवून पहिली तर देवेंद्र जोशी 85.20 टक्के गुण मिळवून दुसरा आणि प्राची माळी तिसरी आली आहे. कडाव येथील श्री गजानन विद्यालयात आर्यन भुरगुणे 88. 20 टक्के गुण मिळवून पहिला तर सानिया शेख 87.80 टक्के गुण मिळवून दुसरी तर सुजल गुरव तिसरी आली आहे.